13 August 2020

News Flash

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

एक्स्प्रेस पकडण्याची अतीघाई हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : फलाटात येणारी एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात घडलेल्या घटनेत तरुण फलाट व एक्स्प्रेसमधील रिकाम्या जागेत पडला. एक्स्प्रेस पकडण्याची अतीघाई हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

दुपारी पावणेतीनच्या सुमारास दादर स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिंहगड एक्स्प्रेस प्रवेश करत होती. एक्स्प्रेस येताच सीएसएमटीच्या दिशेने उभ्या असणाऱ्या तरुणाने यातील एका डब्यात प्रवेश करण्याची घाई केली. मात्र त्याचा तोल सुटल्याने तो फलाट व एक्स्प्रेसच्या रिकाम्या जागेत पडला. तरुण चाकाखाली आल्याने त्याच्या शरीराचे तुकडे झाले, अशी माहिती दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.डी. पांढरे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:01 am

Web Title: youth dies after fall down while catching sinhagad express zws 70
Next Stories
1 राज ठाकरे यांनी दिलेला इशारा खरा ठरला आहे -शालिनी ठाकरे
2 “…अन् कसाबने ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या”
3 Video: अंधेरी स्थानकात सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…
Just Now!
X