26 September 2020

News Flash

तरुणाच्या भरधाव गाडीची पोलिसासह महिलेला धडक

माहीम येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका इंडिका गाडीने धडक दिल्याने पोलीस हवालदारासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी सकाळी माहीमच्या नवीन पोलीस कॉलनी येथे

| December 19, 2012 06:36 am

माहीम येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका इंडिका गाडीने धडक दिल्याने पोलीस हवालदारासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी सकाळी माहीमच्या नवीन पोलीस कॉलनी येथे ही घटना घडली.
सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास भक्ती तांडेल (३०) ही महिला माहीम पश्चिमेच्या रहेजा मार्गावरील नवीन पोलीस कॉलनीसमोरून जात होती. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या इंडिका विस्टा (एम एच ०१- बीडी ८०३६) या गाडीने भक्ती यांना तसेच रस्त्यावर उभ्या असलेले पोलीस हवालदार ज्ञानदेव शिंदे यांना जोरदार धडक दिली. या नंतर या गाडीने उभ्या असलेल्या एका वाहनालाही धडक दिली. या धडकेत तांडेल आणि हवालदार शिंदे गंभीर जखमी झाले. तांडेल यांच्यावर रहेजा रुग्णालयात तर शिंदे यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. माहीम पोलिसांनी वाहनचालक नागेंद्र पुजारी (२०) याला अटक केली आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:36 am

Web Title: youth driven faster car hited lady and police
Next Stories
1 दहिसरमध्ये वहिनीच्या प्रियकराची हत्या
2 अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
3 ‘२१ डिसेंबरला जगबुडी ही अफवा’
Just Now!
X