05 March 2021

News Flash

मीरारोडमध्ये भ्रमणध्वनीने तरुणीचा जीव घेतला

भ्रमणध्वनीवर गाणी ऐकण्याच्या नादात एका तरुणीला जीव गमवावा लागला. मीरा रोड येथे बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली.

| November 29, 2013 02:21 am

भ्रमणध्वनीवर गाणी ऐकण्याच्या नादात एका तरुणीला जीव गमवावा लागला. मीरा रोड येथे बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. राजश्री जाधव (१८) असे या तरुणीचे नाव आहे. गच्चीवर भ्रमणध्वनीवर गाणी ऐकत असताना तो हातातून निसटला आणि भ्रमणध्वनी पकडण्याच्या नादात तोल जाऊ ती खाली पडली.
राजश्री ही मीरा रोड पूर्वेच्या पूजा गार्डन परिसरातील गगनगिरी इमारतीत राहात होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर तिचा टेरेस फ्लॅट होता. दहिसर चेकनाक्याजवळील ठाकूर मॉलमध्ये ती काम करत होती. बुधवारी रात्री घरी गाणी ऐकताना हातातून निसटलेला भ्रमणध्वनी पकडण्याच्या प्रयत्नात गच्चीतून खाली पडून ती जखमी झाली़  तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.   उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 2:21 am

Web Title: youth fall from building to dead in mira road
Next Stories
1 सागरी सेतूवरील अपघातातून डॉक्टर बचावले
2 नवी मुंबईत मित्रांच्या भांडणात एकाचा मृत्यू
3 हिवाळी अधिवेशनात ‘आदर्श’ अहवाल मांडणार का? – उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
Just Now!
X