18 October 2019

News Flash

प्रा. साहूराजा यांच्या ज्ञानदानाचा सुवर्णमहोत्सव उत्साहात साजरा

प्रा. साहूराजांच्या जीवनावरील चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

एमडी, रुईया, पोदार व वेलिंगकर या महाविद्यालयांत प्रदीर्घ काळ ज्ञानदान करणारे प्रा. रोहिंटन रतनशॉँ साहूराजा यांच्या वयाचा अमृत महोत्सव आणि त्यांच्या ज्ञानदानाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा शिक्षकदिनी मोठय़ा थाटय़ामाटात पोदार महाविद्यालयात पार पडला. त्यावेळी कुलकर्णी बोलत होत्या. या गौरव सोहळ्याचे रुईया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि निर्मिती युथ फाऊंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. साहूराजांच्या जीवनावरील चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. चित्रफीत तयार करणाऱ्या सुनील सावंत याचे प्रा. साहूराजा यांनी यावेळी कौतुक केले. चेतन राणा यांनी हॅप्पी पर्थ डे टू साहूराजा ..हे गीत गायले असता त्या गाण्याची प्रा. साहूराजांनी ‘हॅप्पी बर्थ डे टू ऑल रिचर्स,’ ‘हॅप्पी बर्थ डे टू ऑल स्टूडंटस’ अशी ओळ गाऊन हे गाणे कोणा एका व्यक्तीसाठी मर्यादित न ठेवता ते सर्वसमावेश केल्यावर सर्वच उपस्थितांनी त्यांना दाद दिली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संचालक मनीषा कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, पोदार महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभना वासुदेवन, निर्मिती युथ फाऊंडेशनचे भास्कर शेट्टी, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेचे कुलगुरू डॉ.गणपती यादव यांनी आपल्या भाषणात प्रा. साहूराजांबद्दल गौरोवोद्गार काढले. निर्मिती युथ फाऊंडेशनने यावेळी पुणेरी पगडी घालून प्रा.साहूराज यांचा सत्कार केला. प्रा. साहूराजा यांची विद्याíथनी कांचन सुनील सावंत यांनी लिहिलेले ‘शिक्षणयोगी साहूराजा’ या चरित्रपर पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमांची सांगता करताना प्रा. साहूराजा यांनी माऊथ ऑर्गनवर गीत आळवून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन प्रा.ललिता परांजपे यांनी केले तर प्रा. दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

First Published on September 12, 2015 1:45 am

Web Title: youth foundation organized golden jubilee ceremony on eve of teachers day
टॅग Teachers Day