महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नौशाद जब्बार सिद्दीकी (२०) याला रविवारी खेरवाडी पोलिसांनी अटक केली.
सिद्दिकी हा धारावी येथे राहणारा आहे. सहा महिन्यापासून तो पीडित मुलीवर बलात्कार करीत होता, अशी तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. सिद्दिकीने या मुलीचे छायाचित्रण करून तिचे फोटो समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी दिल्याने पीडित मुलीने याची वाच्यता कुठे केली नाही, असे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. सिद्दिकी याने मुलीवर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुलीने याबाबत आईला माहिती दिली.