मुंबईत २००६ मध्ये उपनगरी रेल्वेगाडय़ांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटांमध्ये जखमी झालेल्या अमित सिंग (२६) या तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. गेल्या सात वर्षांपासून अमितची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर २००६ मध्ये उपनगरी रेल्वेगाडय़ांमध्ये स्फोट झाले होते. यात उपनगरी रेल्वेमधून प्रवास करत असलेला अमित जखमी झाला होता. तो कोमात गेला होता. त्याच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. पण गुरुवारी अखेर अमितची सात वर्षांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला.