News Flash

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणाला तुरुंगवास

आपल्यावरील आरोप खोटे असून अल्पवयीन मुलीच्या पालकांनी आपल्या विनाकारण याप्रकरणी गोवल्याचा दावा आरोपीकडून केला गेला होता.

मुंबई : अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करणे हाही लैंगिक अत्याचारच आहे, असे नमूद करत सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या तरुणाला बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) दोषी ठरवले. तसेच त्याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांचा दंडही सुनावला असून त्यातील १० हजार रुपये अपील करण्याचा कालावधी संपल्यावर मुलीला देण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ही घटना घडली होती. आपल्यावरील आरोप खोटे असून अल्पवयीन मुलीच्या पालकांनी आपल्या विनाकारण याप्रकरणी गोवल्याचा दावा आरोपीकडून केला गेला होता. आपण  धर्माचे असून त्यांच्या मुलीशी आपली मैत्री तिच्या कुटुंबीयांना मान्य नसल्यामुळे आपल्यावर खोटा आरोप केल्याचा दावाही त्याने केला होता. अटकेनंतर गेल्या १३ महिन्यांपासून हा तरुण कारागृहातच होता. त्यामुळे शिक्षेचा कालावधी त्याने आधीच पूर्ण केला असून त्याची सुटका होणार आहे. आरोपी तरुणाला ‘पोक्सो’च्या कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले त्यात तीन वर्षांपर्यंतची तरतूद आहे. परंतु गुन्हा घडला त्या वेळी तरुण १९ वर्षांचा होता.

आरोपीने केलेल्या गुन्ह््याचे स्वरूप लक्षात घेता त्याला शिक्षेत दया दाखवणे आणि एक चांगले आयुष्य जगू देण्याची संधी द्यायला हवी, असे न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावताना नमूद केले.

याप्रकरणी पीडित मुलगी आणि पोलिसांची साक्ष नोंदवण्यात आली. घटनेच्या दिवशी बहिणीसह बाहेर गेले असताना शेजारीच राहणाऱ्या आरोपीने आपल्याकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले होते हे पीडित मुलीने न्यायालयाला सांगितले.

मुलीच्या तक्रारीनंतर आपण आरोपीकडे जाऊन घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यावर आरोपीला अटक करण्यात आल्याचे मुलीच्या आईने न्यायालयाला सांगितले, तर आरोपीने केलेली कृती ही लैंगिक अत्याचाराच्या हेतूने केली नव्हती,  याप्रकरणी पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा दावाही आरोपीतर्फे करण्यात आला. परंतु आरोपीला गोवण्यात आल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे नमूद करत न्यायालयाने तो युक्तिवाद फेटाळून लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 1:47 am

Web Title: youth jailed molestation of minor girl akp 94
Next Stories
1 महिलेची हत्या करून एकाची आत्महत्या
2 एकमजली संरक्षित झोपड्यांवर कारवाई नको!
3 बदली धोरणात शिक्षक दांपत्याच्या एकत्र नियुक्तीस प्राधान्य नाही!
Just Now!
X