26 February 2021

News Flash

मुलुंडमध्ये अपघातात तरुण ठार

भरधाव जाणाऱ्या मोटारीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला तर दुसरा जखमी झाला गुरूवारी रात्री मुलुंडच्या एलबीएस रोडवर हा अपघात झाला.

| February 21, 2015 04:15 am

भरधाव जाणाऱ्या मोटारीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला तर दुसरा जखमी झाला गुरूवारी रात्री मुलुंडच्या एलबीएस रोडवर हा अपघात झाला.
 पवईच्या एका कंपनीत अभियंते म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारी (२५), निलेश वाणी हे तरुण आपल्या अन्य सहकाऱ्यांसह मुलुंडला आपल्या मैत्रिणीला घरी सोडण्यासाठी होंडा आय टेन गाडीने निघाले होते. मुलुंडला मैत्रिणीला सोडून त्यांची गाडी पवईला परतीच्या दिशेने निघाली होती. गाडीच्या मागे तिघे आणि चालकाच्या शेजारी एक जण बसला होता. एलबीएस मार्गावर भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना धडक देत झाडावर आदळली. गाडीच्या मागे बसलेले सिद्धार्थ भंडारी आणि निलेश वाणी गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान सिद्धार्थ भंडारी याचा मृत्यू झाला. निलेश वाणी याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 4:15 am

Web Title: youth killed in mulund accident
Next Stories
1 वाहतुकीचे दर कमी करण्याची भाजपची मागणी
2 निर्घृण खुनातील फाशी रद्द
3 हे तर मुंबईचे ‘मृत्यू प्रमाणपत्र’
Just Now!
X