17 January 2021

News Flash

चेंबूरमध्ये तरुणाची हत्या

चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू के

मुंबई : मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच आरोपींनी चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री चेंबूर येथे घडली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

चेंबूर कॉलनी परिसरातील रहिवासी अक्षय देसाई (२१) शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मित्रासोबत घराबाहेर फिरत होता. त्या वेळी अन्य एका मित्राला काहीजण पैशाच्या वादातून मारहाण करीत असल्याचे त्याने पाहिले. मित्राला सोडवण्यासाठी तो तेथे गेला असता आरोपींनी चाकूने त्याच्यावर अनेक वार केले.

यात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. फरार झालेल्या अमर सिंग (२०), अजय स्वामी (२९), रमण शेट्टी (२२) आणि विशाल जाधव (२८) या चौघांना पोलिसांनी काही तासांत अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 12:17 am

Web Title: youth murder in chembur zws 70
Next Stories
1 महम्मद अली रोडवरुन पोलिसांनी हटवले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे पोस्टर्स
2 ते गोपनीय पत्र लीक कसं झालं? मुंबईत लोकल सुरु करण्यावरुन राजकारण?
3 …तर त्यांना अटक करून १० वर्षांसाठी अंदमानात पाठवावे – संजय राऊत
Just Now!
X