News Flash

कोकणातील युवकांनी शेतीकडे वळावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

(संग्रहित छायाचित्र)

शेती ही शाश्वत आहे. करोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा, असे आवाहन करत महाविकास आघाडी सरकार कोकणच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.

करोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली, पण या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला राहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने ‘विकेल ते पिकेल’ योजना सुरू केली आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधीच लपवले नाही. म्हणूनच मी गेल्या वर्षी भराडीदेवीच्या दर्शनाला आलो होतो. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असताना करोना आला आणि सगळे ठप्प झाले. असे असले तरी कोकणाचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच. माझा कोकण संपन्न झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आंगणेवाडीच्या जत्रेत करोनाकाळात गर्दी करू नका, या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल भाविकांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, असा आशीर्वाद मागताना कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.

कोकणात पाऊस भरपूर पडतो, पूर येतो, अतिवृष्टी होते; पण ते संपल्यानंतर सगळे पाणी वाहून समुद्राला मिळते. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग अनेक खलबते होतात, योजना पुढे येतात; पण आज अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या. त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. योजनांसाठी पाठपुरावा करून घेता, याला अधिक महत्त्व आहे. या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाइन करतो आहोत; पण धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन

आहे. अनेक जण स्वत:साठी काही ना काही मागत असतात, पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत. स्वत:साठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:25 am

Web Title: youth of konkan should turn to agriculture cm uddhav thackeray abn 97
Next Stories
1 आयएनएस ‘करंज’ १० मार्चला नौदलाच्या ताफ्यात
2 ‘मुंबईत ‘कराची बेकरी’ पुन्हा सुरू होणार, नावही बदलणार नाही!’
3 मुंबई : वडील आणि आजोबाची हत्या करून तरुणाने इमारतीवरून मारली उडी
Just Now!
X