News Flash

मनोरंजनाचा नवा चेहरा : ‘यूटय़ूब चॅनल्स’

मालिका, चित्रपटवाहिन्यांना पर्यायी ठरू शकेल अशी समांतर व्यवस्था यूटय़ूब चॅनल्सच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात जोम धरू लागली असून तरुणांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या

| January 26, 2015 01:46 am

मालिका, चित्रपटवाहिन्यांना पर्यायी ठरू शकेल अशी समांतर व्यवस्था यूटय़ूब चॅनल्सच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात जोम धरू लागली असून तरुणांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भारतातही वाढू लागली आहे.
आतापर्यंत टीव्हीवरील आपल्या आवडत्या कार्यक्रमांच्या वेळेनुसार आपल्या कामकाजाच्या वेळा ठरविल्या जायच्या. परंतु, आधीच्या पिढीचे हे नियम फेटाळून तरुणाई दृक्श्राव्य मनोरंजनाचा आनंदही त्यांच्या सवडीनुसार घेऊ पाहते आहे. यामुळे सध्या कित्येक टीव्ही वाहिन्या आणि चित्रपटनिर्मिती संस्था स्वत:च्या यूटय़ूब चॅनल्सच्या माध्यमातून जास्तीतजास्त तरुणांपर्यंत मालिका आणि चित्रपट पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘बिईंग ‘ाुमन’, ‘द व्हायरल फिव्हर’ (टीव्हीएफ), ‘शुद्ध देसी एन्डिंग’, ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ अशी कित्येक चॅनल्स खास यूटय़ूबसाठी व्हिडीयोज बनवण्यामध्ये गुंतल्या आहेत. या प्रत्येक चॅनलकडे नोंदणीकृत प्रेक्षकांची संख्या कोटींच्या घरामध्ये पोहचली आहे.
२००५मध्ये ‘यूटय़ूब’सोबतच ‘यूटय़ूब चॅनल्स’चा जन्मही झाला. घरच्या घरी मोबाइलच्या कॅमेऱ्यावरून चित्रित केलेले व्हिडीयोज इंटरनेटवर टाकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची ही क्लृप्ती तरुणांना आकर्षित करू लागली. आजच्या घडीला दिवसभरात विविध विषयाचे कित्येक व्हिडीयोज या मुक्त व्यासपीठावर पडत असतात. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्हिडीओजना तरुणांना मोठा प्रतिसाद मिळतो.
५ ते ७ ‘डीएसएलआर’चा कॅमेरा, छोटी खोली इतकीच गुंतवणूक असलेल्या या चॅनल्स जाहिरातदारांनाही खुणावू लागले आहे. सध्या भारतीय यूटय़ूब चॅनल्सच्या बाजापेठेमधील गुंतवणूक १०० कोटी रुपयांची असून येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये हे माध्यम सहजपणे टीव्हीक्षेत्राला टक्कर देण्याइतके सक्षम होऊ शकत असल्याचे, ‘शुद्ध देसी एन्डिंग’ या चॅनलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आनंद दोशी यांनी सांगितले. यूटय़ूब या चॅनल्ससोबत जाहिरातींसाठी भागीदारी करतो आणि महिनाभराच्या प्रेक्षकवर्गाच्या आकडेवारीनुसार त्यातील ५५ टक्क्यांपर्यंतचा वाटा चॅनल्सना मिळत असल्याचे ते सांगतात.

यूटय़ूबचे नोंदणीकृत प्रेक्षक
टी-सीरिज – ६,३५२,३५३
सेट इंडिया – ३,९२६,३७४
कलर्स टीव्ही – २,६९६,८६८
राजश्री – १,५५०,५७४
टीव्हीएफ – ८८८,६१७
बिइंग इंडियन – २४४,१३९

विषयांचे वेगळेपण
या व्हिडीयोंमधून विनोदापासून सामाजिक विषयांपर्यंत विविध विषय हाताळले जातात. सध्या चित्रपटांचे समीक्षण, पाककृती, सौंदर्य, आरोग्य, बॉलिवूड या विषयांवरील व्हिडीओ भारतात गाजत असल्याचे ‘यूटय़ूब’चे भारतातील कंन्टेट हेड सत्यनारायण राघवन यांनी सांगितले. या क्षेत्राने कित्येक तरुणांना लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञ या क्षेत्रामध्ये रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. तन्मय भट, अभिष मॅथ्यू, बिस्वापती सरकार यांसारखी नावे या चॅनल्सच्या माध्यमातून लोकप्रिय होत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:46 am

Web Title: youtube channel for new face of entertainment
टॅग : Entertainment
Next Stories
1 बहुस्तरीय अध्ययनाची संधी पुरवण्यात शिक्षण व्यवस्था अपयशी
2 पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना विशेष पुरस्कार
3 अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बुद्धिवंतांची भूमिका पक्षपाती
Just Now!
X