News Flash

‘लोकसत्ता लोकांकिका’चा झी मराठी टेलीव्हिजन पार्टनर

राज्यभरात आठ विभागांमधील स्पर्धा केंद्रे जाहीर झाली आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’चा झी मराठी टेलीव्हिजन पार्टनर

राज्यभरातील सर्जनशील तरुण मनांचा नाटय़गुण जोखणाऱ्या आणि गेल्या चार वर्षांत नाटय़-चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा यंदा झी मराठी टेलीव्हिजन पार्टनर आहे. त्यामुळे राज्यभरातील ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावरील तरुणाईचा नाटय़ाविष्कार झी मराठीवरही अनुभवता येणार आहे.

ही नाटय़धुमाळी २५ नोव्हेंबरपासून मुंबईपासून सुरू होणार आहे. लोकांकिकांच्या मंचावर तरुणांच्या नाटय़ाविष्काराला दाद देण्यासाठी, त्यांना दिशा देण्यासाठी रंगभूमीपासून सुरुवात करून आज बॉलीवूडमध्ये स्वत:ची वहिवाट निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेता मनोज वाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. यंदा झी मराठी वाहिनीचे नाव या स्पर्धेबरोबर जोडले गेले आहे.

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ची नाटय़धुमाळी २५ नोव्हेंबरपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राज्यभरात आठ विभागांमधील स्पर्धा केंद्रे जाहीर झाली आहेत. स्पर्धेच्या नेहमीच्या स्वरूपाप्रमाणे याही वर्षी प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि त्यानंतर महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी स्पर्धकांना चुरशीचा सामना करावा लागणार आहे.

प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी अशी एकामागोमाग एक आव्हाने पूर्ण करत महाअंतिम फेरीत चुरशीचा नाटय़सामना खेळण्यासाठी तयार असणाऱ्या तरुणाईला थेट मनोज वाजपेयी यांचे विचार ऐकता येणार आहेत. बॉलीवूडमध्ये कोणतीही चित्रपटाची पाश्र्वभूमी नसताना प्रवेश करणे हेही धाडस खरे; पण अभिनेता म्हणून लौकिक मिळवल्यानंतरही व्यावसायिक चित्रपटांची पठडीतील वाट नाकारत आपल्याला योग्य वाटेल अशाच भूमिका करणारा हा अभिनेता म्हणूनच वेगळा ठरतो. मनोज वाजपेयी यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास १९९४ मध्ये ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटाने सुरू झाला. त्या चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या गोविंद निहलानी यांच्या ‘द्रोहकाल’ या चित्रपटातही त्यांची अगदी छोटी भूमिका होती. रामगोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’मधील भिकू म्हात्रे या भूमिकेनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग पुन्हा ‘पिंजर’ चित्रपटातील भूमिकेसाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. प्रकाश झा, अनुराग कश्यप, हन्सल मेहता, नीरज पांडे यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांसमवेत काम करणाऱ्या या कलाकारासाठी म्हणून काही चित्रपट लक्षात राहतात. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधील सरदार खान, ‘अलीगड’मधील प्राध्यापक, ‘स्पेशल छब्बीस’मधील पोलीस अधिकारी अशी प्रत्येक भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केली. या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण मनोज वाजपेयी यांच्या हस्ते होणार आहे. त्याच वेळी ते युवा रंगकर्मीशी संवादही साधणार आहेत. त्यामुळे चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिकांच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवा रंगकर्मीसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे.

‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी सुरुवातीपासूनच टॅलेंट सर्च पार्टनर म्हणून बरोबर असलेले ‘आयरिस प्रॉडक्शन’ याही वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर चमकणाऱ्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देणार आहेत. ‘एरेना मल्टिमीडिया’ या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहतील. टेलीव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी’ सहभागी होणार आहे.

स्पर्धा अशी होईल..

‘लोकांकिका’चा प्रवास मुंबईत २५ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या विभागीय प्राथमिक फेरीपासून सुरू होईल. त्यानंतर ठाणे (१ आणि २ डिसेंबर), नाशिक (७ आणि ८ डिसेंबर), रत्नागिरी (४ डिसेंबर), पुणे (१ आणि २ डिसेंबर), कोल्हापूर (१० आणि ११ डिसेंबर), औरंगाबाद (३ आणि ४ डिसेंबर) आणि नागपूर (२ आणि ३ डिसेंबर) असे वळण घेत ही स्पर्धा विभागीय अंतिम फेरीच्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेईल. त्यानंतर ८ ते १३ डिसेंबरदरम्यान विभागीय अंतिम फेऱ्यांच्या माध्यमातून हा प्रवास वेग घेईल. त्यात निवड झालेल्या सवरेत्कृष्ट आठ विभागीय एकांकिकांमधून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल.

विभागीय प्राथमिक फेरीचे वेळापत्रक

*  मुंबई – २५ नोव्हेंबर – मकरंद पाटील (९८९२५४७२७५)

*  ठाणे – १ आणि २ डिसेंबर – मिलिंद दाभोळकर (९१६७२२१२४६), सुभाष कदम (९७६९३६८१११)

*  नाशिक – ७ आणि ८ डिसेंबर – वंदन चंद्रात्रे (९४२२२४५०६५)

*  रत्नागिरी – ४ डिसेंबर – हेमंत चोप्रा (९४२००९५१०४)

*  पुणे – १ आणि २ डिसेंबर – अमोल गाडगीळ (९८८१२५६०८२)

*  कोल्हापूर – १० आणि ११ डिसेंबर – दीपक क्षीरसागर (९८८१२५६०४९)

*  औरंगाबाद – ३ आणि ४ डिसेंबर – शिवा देशपांडे (९९२२४००९७६)

*  नागपूर – २ आणि ३ डिसेंबर – गजानन बोबडे (९८२२७२८६०३)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 3:23 am

Web Title: zee marathi television partner of loksatta lok kika
Next Stories
1 भेसळखोरांना आता आजन्म कारावास
2 हॉटेल-पबची सुरक्षाविषयक माहिती ऑनलाइन उपलब्ध करा!
3 कोळीवाडे, गावठाणांबाबत लवकरच स्वतंत्र धोरण!
Just Now!
X