News Flash

धारावीकरांसाठी चांगली बातमी; मागील २४ तासांत एकाही करोना रुग्णाची नोंद नाही

धारावीत राबवण्यात आलेल्या ‘धारावी मॉडेल’चे जगभरात कौतुक करण्यात आले आहे

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर धारावीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली होती. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचा भाग असल्याने हा परिसर करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला. पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत धारावीकरांनी करोनावर मात केली. आता पुन्हा एकदा धारावीत एकाही करोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

मुंबईतील धारावी भागात गेल्या २४ तासांत एकाही नव्या करोना रुग्णाची नोंद झालेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी याबाबत माहिती दिली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल रोजी धारावी येथे एकाच दिवसात सर्वाधिक ९९ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे पहिल्या लाटेत महापालिकेची चिंता वाढवलेल्या धारावीने दुसऱ्या लाटेला थोपवल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा >> करोनाची दुसरी लाटही धारावी थोपवते तेव्हा..

गेल्या आठवड्यापासून एक ते तीन रुग्णांची नोंद

गेल्या मंगळवारी लॉकडानचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर धारावी येथे करोनाच्या संसर्गाचे सहा नवीन रुग्णांची नोंदली गेली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. करोनाचा नवा एकही रुग्ण न आढळल्याने धारावीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

हे ही वाचा >>धारावीत करोनाचा कहर थांबला; अजय देवगणने व्यक्त केला आनंद, म्हणाला…

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ६,८४४ पर्यंत पोहोचली आहे. तर ६,४६५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. धारावीत २० रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. जी / उत्तर वॉर्डमधील करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेने जाहीर केली. या वॉर्डमध्ये येणाऱ्या देखील दादरमध्ये ३ तर माहिममध्ये ६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.

दरम्यान, याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील माहिती दिली आहे. “हे मुंबई महापालिकेचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. ७ वेळा धारावी शून्यावर आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. धारावीकर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवलं आहे” किशोरी पेडणेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.

धारावी मॉडेलचे कौतुक

मुंबईत गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला तेव्हा १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण सापडला आणि पालिकेची यंत्रणा सतर्क झाली. चिंचोळ्या गल्लय़ांमध्ये खेटून असलेल्या झोपडय़ा आणि एकेका झोपडीत आठ ते दहा लोकांचे वास्तव्य असलेल्या धारावीत संक्रमण कसे रोखायचे असा गहन प्रश्न पालिकेपुढे होता. पण त्यावेळी पालिकेच्या जी उत्तर विभागाने ज्या उपाययोजना केल्या त्याला ‘धारावी मॉडेल’ म्हणून जगभरात ओळख मिळाली. मात्र रुग्णसंख्या ओसरल्यानंतरही संक्रमण रोखण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेने मेहनत घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 5:39 pm

Web Title: zero coronavirus cases in dharavi mumbai since last 24 hours says bmc abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “ऊर भरून आला”! जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला खोचक टोला
2 Birthday Special Video : ‘ही’ आहे राज ठाकरेंच्या मनातील खंत
3 “…म्हणून कारने आत्महत्या केली”; जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारला लगावला टोला
Just Now!
X