ठाणे : माणसाला इतर कुणाची नसली तरी सावलीची सदैव सोबत असते, असे म्हणतात. मात्र ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावच्या अक्षांशाइतकी होते, त्या दिवशी सूर्य डोक्यावर आल्यावर सावली पायाखाली आल्याने काही काळ अदृश्य  झाल्याचा अनुभव येतो. मे महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा शून्य सावलीचा अनुभव घेता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. १६ मे रोजी मुंबईतून आणि १७ मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याणमधून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी आपली सावली काही काळ दिसणार नाही, असे ते म्हणाले.

अन्यत्र कधी?

८ मे- सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड, राजापूर. १० मे- कोल्हापूर, मिरज, सांगली. ११ मे- रत्नागिरी. १२ मे- सातारा, सोलापूर. १३ मे- उस्मानाबाद. १४ मे- रायगड, पुणे, लातूर. १५ मे- अंबेजोगाई. १६ मे- नगर, परभणी, नांदेड. १७ मे- पैठण. १९ मे- औरंगाबाद, बीड, जालना, चंद्रपूर. २० मे- नाशिक, वाशीम, गडचिरोली. २१ मे- बुलढाणा, यवतमाळ. २२ मे- वर्धा. २३ मे- धुळे. २४ मे- भुसावळ, जळगाव.

ठाण्यात १७ मे रोजी ‘शून्य सावली’

माणसाला इतर कुणाची नसली तरी सावलीची सदैव सोबत असते, असे म्हणतात. मात्र खगोलविश्वात एखादा दिवस या नियमाला अपवाद ठरतो. ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावच्या अक्षांशाइतकी होते, त्या दिवशी सूर्य डोक्यावर आल्यावर सावली पायाखाली आल्याने चक्क काही काळ अदृश्य होते. खगोलीय भाषेत याला शून्य सावलीचा दिवस असे म्हणतात. मे महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी शून्य सावलीचा अनुभव घेता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.  १६ मे रोजी मुंबईतून आणि १७ मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याणमधून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात आपली सावली पायाखाली आल्याने दिसणार नाही, असे सोमण यांनी सांगितले.