समीर वानखेडे यांच्या तक्रारीप्रकरणी चौकशीचे आदेश

साध्या वेशात पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार महासंचालकांकडे करण्यात आली.

पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबईतील दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सोमवारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेऊन मुंबई पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांची तक्रार केली. ते दोन कर्मचारी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यातील असल्याची चर्चा आहे. वानखेडे २०१५ पासून ओशिवरा स्मशानभूमीत दररोज सकाळी जातात. त्यावेळी दोन कर्चमाऱ्यांनी जाऊन त्यांचे चित्रीकरण मिळवल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता. साध्या वेशात पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार महासंचालकांकडे करण्यात आली. त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: %e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0 %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%87 %e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%8d

ताज्या बातम्या