मुंबईत महिलांचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

मुंबई : महिला प्रवाशांसाठी धावत असलेल्या ‘तेजस्विनी’ बसगाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. येत्या काही महिन्यांत मुंबईत टप्प्याटप्यात १०० ‘तेजस्विनी’ बसगाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली. त्यामुळे महिलांचा प्रवास सुकर होण्यात मदत होईल, असा दावा बेस्टकडून करण्यात आला आहे.

बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून कार्यालयीन वेळांमध्ये सकाळी व सायंकाळी बेस्ट बसगाड्यांमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू लागले आहेत. त्यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. बेस्ट उपक्रमाकडून महिला प्रवाशांसाठी विशेष बस फेऱ्या चालविल्या जातात. 

नोव्हेंबर २०१९ पासून महिलांसाठी आरक्षित बस ‘तेजस्विनी’ नावाने टप्प्याटप्यात ताफ्यात येऊ लागल्या. आजघडीला साधारण ३७ ‘तेजस्विनी’ धावत आहेत. सकाळी ८ ते सकाळी ११.३० आणि दुपारी ४.३० ते रात्री ८ या वेळेत महिला प्रवाशांसाठी ‘तेजस्विनी’ धावतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मुंबईत करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि त्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्याही कमीच होती. परंतु निर्बंध शिथिल झाल्याने बेस्ट बसमधील प्रवाशांची गर्दी पूर्ववत होऊ लागली आहे. कार्यालय व अन्य कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्याही वाढू लागली आहे.

मागणीनुसार फेऱ्यांत वाढ

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेस्टच्या ताफ्यात नव्या बसगाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्र माचे महाव्यवस्थापक लोके श चंद्र यांनी घेतला आहे. महिला प्रवाशांसाठी १०० बस ‘तेजस्विनी’ समाविष्ट करण्याचा मानस आहे. गर्दीच्या वेळी महिलांसाठी ‘तेजस्विनी’ बसची धाव जास्त असेल. त्यामुळे ‘तेजस्विनी’ बसची एकू ण संख्या १३७ पर्यंत पोहोचणार आहे. मागणीनुसार महिला प्रवाशांसाठी बस फे ऱ्यांमध्येही वाढ के ली जात असल्याचे लोके श चंद्र यांनी सांगितले.