scorecardresearch

मुंबईत १०११ जणांना संसर्ग

गुरुवारी मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. मात्र, शुक्रवारी यामध्ये काहीशी घट झाली असून एकाच दिवशी १०११ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत १०११ जणांना संसर्ग
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : गुरुवारी मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. मात्र, शुक्रवारी यामध्ये काहीशी घट झाली असून एकाच दिवशी १०११ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

१०११ पैकी ९४१ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर ७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  रुग्णवाढीचा दर ०.०७९ टक्के आहे.  शुक्रवारी १३ हजार ४६८ करोना चाचण्या करण्यात आल्या.  रुग्ण बरे होण्याचा दर ९७.८ टक्के आहे. सध्या मुंबईत एकही चाळ किंवा इमारत प्रतिबंधित नाही.

ठाणे जिल्ह्यात चिंता..

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी ४४७ नवे करोना रुग्ण आढळले. यापैकी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १९४ सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात १६२ बाधित रुग्णांची नोंद झाली. गणेशोत्सव नजीक आला असताना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली. जिल्ह्यात गेल्या आठवडय़ात दररोज १८० ते २५० रुग्ण आढळत होते. तर शुक्रवारी करोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.