Premium

‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ कंपन्या स्पर्धेत

दोन टप्प्यात या मार्गिकेचे काम करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी १० तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ९ निविदा सादर झाल्या आहेत.

11 companies competition construction of metro 12 route mumbai
‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ कंपन्या स्पर्धेत (संग्रहित छायचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: नवी मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ कंपन्या इच्छूक आहेत. त्यामुळे आता या ११ कंपन्यामध्ये स्पर्धा असणार आहे. दोन टप्प्यात या मार्गिकेचे काम करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी १० तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ९ निविदा सादर झाल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असून त्यानंतर तात्काळ बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने ३३७ किमी लांबीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील १२ वी मार्गिका कल्याण – तळोजा अशी आहे. ही मार्गिका २०.७५ किमी लांबीची असून यात १८ स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेवर कल्याण एपीएमसी, गणेश नगर (कल्याण), पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा (डोंबिवली पूर्व), हेदुतने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाक्लन, तुर्भे, पिसार्वे आगार, पिसार्वे आणि तळोजा या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला असून काही दिवसांपूर्वीच या मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. दोन टप्प्यात या मार्गिकेचे काम करण्यात येणार असून दोन टप्प्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सुमारे ५८६५ रुपये खर्चाच्या या कामासाठी १९ निविदा जारी करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा… मुंबई : एमएमआरसी पावसाळ्यासाठी सज्ज

एमएमआरडीएने ३१ मे रोजी तांत्रिक निविदा खुल्या केल्या असून पहिल्या टप्प्यात १०, तर दुसऱ्या टप्प्यात ९ अशा एकूण १९ निविदा सादर झाल्या आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. लवकरच या निविदांची छाननी करून आर्थिक निविदा उघडण्यात येतील. त्यानंतर निविदा अंतिम करून बांधकामाचे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यादेश जारी करून मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी तीन – चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर ‘मेट्रो १२’च्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… मुंबईत रेल्वेचा १४ तासांचा मेगा ब्लॉक; कुठे-कधी ? वाचा सविस्तर…

अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, गवार कन्स्ट्रक्शन, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, केईसी इंटरनॅशनल आणि लार्सन ॲण्ड टुब्रो यांनी दोन्ही टप्प्यासाठी निविदा सादर केल्या आहेत. तर एनसीसी, सॅम इंडिया बिल्टवेल, एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स आणि टाटा प्रोजक्टस यांनी एका टप्प्यासाठी निविदा सादर केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 18:02 IST
Next Story
मुंबई : शासनाची मान्यता असूनही एकल इमारत पुनर्विकासास म्हाडाचा नकार