मुंबई : मध्य रेल्वेवर रविवार, ३ एप्रिलला ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गावर बारा तांसाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ब्लॉक असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.  सीएसएटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी ७.५५ ते रात्री ७.५० पर्यंत मुलुंड, ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. तर कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल कल्याण, ठाणे ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सीएसएमटी, दादरमधून सुटणाऱ्या मेल, एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या मार्गावरून जातील. या गाडय़ाही १५ ते २० मिनिटे विलंबाने सुटतील.

दरम्यान, हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल ते सीएसएमटी दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ठाणे ते पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्याही रद्द केल्याचे आहेत. ठाणे ते वाशी, नेरुळ अशा लोकल फेऱ्या सुरु असतील. तर सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत याच दोन स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात आलेला आहे.