scorecardresearch

जीवघेणी ‘लाइफलाइन’! एक दिवसात १३ जणांचा मृत्यू

आठ जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे मात्र ती जीवघेणी ठरते आहे असेच दिसते आहे. कारण बुधवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला या लोकलमधून पडून किंवा अपघातातून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये एका महिलेचा आणि १२ पुरुषांचा समावेश आहे. कुर्ला या ठिकाणी २, कल्याण मध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा, वाशीमध्ये एका पुरुषाचा, मुंबई सेंट्रल मध्ये एक, चर्चगेटला १, बोरीवलीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांची ही माहिती मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपवर देण्यात आली आहे.

त्याआधी म्हणजेच ८ ऑक्टोबरलाच ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा एकदा एका दिवसात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई ट्रेन अपडेट्स हा मुंबई लोकल संदर्भातली सगळी माहिती पुरवणारा ग्रुप आहे. यावर ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 13 commuters dead in various incident from mumbai local in one day

ताज्या बातम्या