मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर आणि उपनगरांमधील १,३०४ नवरात्रौत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात देवीमूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था महानगरपालिकेने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- चर्नीरोड स्थानकाजवळच्या ३२ अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई

महापालिकेकडून एकूण १६२ नवरात्रोत्सव मंडळांचे अर्ज फेटाळले

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवात रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना मुंबई महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. मुंबई महानगरपालिकेने यंदा १,३०४ नवरात्रौत्सव मंडळाना परवानगी दिली आहे. एकूण १७०० नवरात्रौत्सव मंडळांनी मंडप परवानगीसाठी महानगरपालिकेकडे अर्ज केले होते. काही मंडळांनी दुबार अर्ज केले होते. अशा मंडळांची संख्या २५० इतकी होती. तर महापालिकेकडून एकूण १६२ नवरात्रौत्सव मंडळांचे अर्ज निरनिराळ्या कारणात्सव फेटाळण्यात आले आहेत.

हेही वाचा- शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी

मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था

गणेशोत्सवाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात यंत्रणांवर ताण कमी असतो. मात्र यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरा होत असून त्यादृष्टीने नवरात्रोत्सव कालावधीत विसर्जनाच्या सुविधेअंतर्गत वीज, विसर्जनासाठी बोट आदी सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच देवीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्थाही महानगरलिकेने केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1304 public mandals mandap permission from mumbai municipal corporation for navratri festival mumbai print news dpj
First published on: 27-09-2022 at 11:13 IST