scorecardresearch

मुंबईत १,३१९ नव्या वाहनांची नोंद

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागत असल्याने ही गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आधीच वाहन दारात आणण्याची पद्धत सुरू केली आहे.

vehicle registration on gudi padwa
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस(file photo)

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मुंबई उपनगरांतील तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) एकूण १,३१९ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. बोरिवली, वडाळा, अंधेरी आणि ताडदेव असे मुंबईत एकूण चार आरटीओ आहेत. यापैकी ताडदेव आरटीओ वगळता तिन्ही आरटीओ मिळून ७०५ दुचाकींची आणि ६१४ चारचाकींची गुढीपाडवा मुहूर्तावर नोंद झाली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागत असल्याने ही गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आधीच वाहन दारात आणण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे बुधवारी गुढीपाडव्याऐवजी मंगळवारी जास्त संख्येने वाहन खरेदीची स्थिती होती.  यंदाच्यावर्षी गेल्या दोन दिवसांत अंधेरी आरटीओत सर्वाधिक म्हणजे ४७२ वाहनांची नोंद झाली आहे. बोरिवलीत आरटीओत ४३० आणि वडाळा आरटीओत ४१७ वाहनांची नोंद करण्यात आलेली आहेत. अंधेरी आरटीओमध्ये मंगळवारी २४९ दुचाकी आणि १६७ चारचाकींची नोंदणी झाली. तर, बुधवारी ४१ दुचाकी आणि १५ चारचाकींची नोंदणी झाली. बोरिवली आरटीओमध्ये मंगळवारी १६९ दुचाकी आणि  २०२ चारचाकींची नोंदणी झाली. तर, बुधवारी २१ दुचाकी आणि ३८ चारचाकींची नोंदणी झाली. तर वडाळा आरटीओमध्ये मंगळवारी २०९ दुचाकी आणि १८४ चारचाकींची नोंदणी झाली असून बुधवारी १६ दुचाकी आणि ८ चारचाकींची नोंदणी झाली. यामध्ये ताडदेव आरटीओकडून मुहूर्ताची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 02:24 IST

संबंधित बातम्या