मध्य रेल्वेवर २८ नोव्हेंबरला १४ तासांचा मेगाब्लॉक

मार्गिकेच्या कामासाठी २८ नोव्हेंबरला १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई : मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. या मार्गिकेच्या कामासाठी २८ नोव्हेंबरला १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

काही तांत्रिक कारणास्तव ब्लॉक न घेतल्यास ५ डिसेंबरलाही तो घेण्याचा पर्याय ठेवल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ब्लॉकदरम्यान काही फेऱ्याही रद्द होतील. तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 14 hour megablock on central railway on 28th november akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या