उपनगरीय रेल्वेच्या १४ मोटरमन, गार्डचा करोनामुळे मृत्यू

उपनगरीय रेल्वेचा गाडा हाकणाऱ्या मोटरमन व गार्डचेही करोनामुळे मृत्यू झाले आहेत.

coronavirus india update, corona
गेल्या २४ तासांमध्ये करोना संसर्गाचे ४२,९८२ नवीन रुग्ण आढळले

मध्य रेल्वेवरील प्रत्यक्षात २४ मोटरमन, गार्डचा मृत्यू झाल्याची कामगार संघटनांचा दावा

मुंबई : उपनगरीय रेल्वेचा गाडा हाकणाऱ्या मोटरमन व गार्डचेही करोनामुळे मृत्यू झाले आहेत. मोटरमन व गार्ड मिळून १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून यात पश्चिम रेल्वेवरील १० जण आहेत. परंतु मध्य रेल्वेवरील दगावलेल्या मोटरमन व गार्डची संख्या ही २४ असल्याचा दावा रेल्वे कामगार संघटनांनी के ली आहे. त्यांना करोना योद्धे म्हणून जाहीर करा आणि त्यांच्या कु टूंबियांना आर्थिक मदत त्वरित देण्याची मागणीही संघटनांनी के ली आहे.

मार्च २०२० च्या अखेरीस करोनामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद झाली. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच दोन-चार फे ऱ्या मध्य व पश्चिम रेल्वेवर सुरू होत्या. त्यानंतर जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावू लागल्या. त्या अद्यापही धावत आहेत. यासाठी मोटरमन व गार्ड नेहमीच कार्यरत राहिले. परंतु कर्तव्य बजावत असताना रेल्वेच्या अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. त्यात काहींचा मृत्यू झाला. यात मोटरमन व गार्डही आहेत.

पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात करोनाबाधित २ हजार ६७६ आणि मध्य रेल्वेच्या १ हजार ३५६ विविध विभागांतील कर्मचारी व त्यांच्या कु टूंबियांतील सदस्यांनी उपचार घेतले. यापैकी पश्चिम रेल्वेवरील २ हजार ५०८ , तर मध्य रेल्वेवरील १,२१५ कर्मचारी व कु टुंबीय सदस्य बरे झाले. तर मध्य रेल्वेवरील १३४ आणि पश्चिम रेल्वेवरील १४९ जणांचा करोनामुळे मृत्यूही झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये पश्चिम रेल्वेवरील ४१ आणि मध्य रेल्वेवरील ३४ कर्मचारी आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत उपनगरीय रेल्वेवर काम करणारे दहा मोटरमन व गार्डचा, तर मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेल-एक्स्प्रेस, लोकल आणि मालवाहतूक रेल्वे गाडय़ांवर काम करणाऱ्या ११ मोटरमन व लोको पायलटचा मृत्यू झाला आहे. यात उपनगरीय रेल्वेवर काम करणारे चार मोटरमन आहेत. मध्य रेल्वेवरील कामगार संघटनांनी मात्र करोनामुळे दगावलेल्या मोटरमन व गार्डची संख्या २४ असल्याचे सांगितले. यात १६ मोटरमन असल्याचा दावा रेल कामगार सेनेने केला आहे.

दगावलेल्या मोटरमन व गार्डची सेवा काळातील सर्व देणी म्हणजेच आर्थिक मदत त्यांच्या कु टूंबियातील सदस्यांना त्वरीत मिळावी आणि अनुकं पातत्वावर नोकरीही देण्याचीही मागणी आहे. या प्रक्रि येत खूपच दिरंगाई होत असून ती लवकर व्हावी अशी मागणी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सचिव नरेंद्र तळेकर यांनी सांगितले.

रेल्वेचेही नुकसान

मोटरमनकडून लोकल चालवण्याचे काम के ले जाते. सिग्नल यंत्रणा आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवून काम करत असतात. त्याचवेळी लोकलच्या शेवटच्या डब्यात गार्ड कार्यरत असतो. लोकल फलाटावर येताच प्रवाशांनी डब्यात प्रवेश के ला आहे की नाही, हे पाहून निश्चित के लेल्या वेळेत बेल वाजवून लोकल पुढे नेण्याची सूचना मोटरमनला करतो. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणे यांसह अन्य जबाबदाऱ्याही ते पेलतात. अशा काही मोटरमन व गार्डही करोनाकाळात रेल्वेने गमावले.

रेल्वेच्या मोटरमन, गार्ड, लोकोपायलटसह विविध विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची सवरेतोपरी काळजी या करोनाकाळात घेतली जात आहे. लोकल गाडय़ा, कार्यालये सॅनिटाईज करणे, मास्कचे वाटप आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरणही करण्यावर अधिक भर दिला आहे. मुंबई विभागात ३२ हजार ५७४ रेल्वे कर्मचारी असून आतापर्यंत ७० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. तर ४५ वर्षांवरील १०० टक्के कर्मचाऱ्यांनीही लस घेतली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कु टूंबियाना आर्थिक मदतही के ली जात आहे.

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील दहा मोटरमन व गार्डचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. त्यांच्या कु टूंबियांनाही आर्थिक मदत के ली आहे. मुंबईतील २० हजार ४३० रेल्वे कर्मचाऱ्यांपैकी लशीची पहिली मात्रा घेतलेले १२ हजार ३४२, तर दुसरी मात्रा घेतलेले ४ हजार ४३४ कर्मचारी आहेत.

– सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 14 motorman guard suburban railway died corona mumbai ssh

ताज्या बातम्या