दशकभरात १,५६८ गगनचुंबी इमारतींना आगीची झळ

‘परिमंडळ-एक’मधील सर्वाधिक म्हणजे ९८७ व्यावसायिक इमारती, तर ‘परिमंडळ-पाच’मध्ये सर्वाधिक १२७३ झोपडय़ांना आग लागली होती.

मुंबई : गेल्या १० वर्षांमध्ये मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी ४८,४३४ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी १५६८ आगीच्या दुर्घटना गगनचुंबी इमारतींमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस बहुमजली इमारती असुरक्षित बनू लागल्या आहेत.

‘परिमंडळ-एक’च्या हद्दीत ९,८८७ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी ३२५ दुर्घटना गगनचुंबी इमारत, एक हजार ५४६ दुर्घटना रहिवासी इमारतीत, ९८७ दुर्घटना व्यावसायिक इमारतीत आणि ७५ दुर्घटना झोपडपट्टीत घडल्या आहेत. ‘परिमंडळ-दोन’च्या हद्दीत सर्वाधिक १०,७१९ आगीच्या दुर्घटना घडल्या असून त्यापैकी १२९ गगनचुंबी इमारती, १,८२४ निवासी इमारती, ६६४ व्यावसायिक इमारती आणि ९३४ झोपडय़ांचा समावेश आहे. ‘परिमंडळ-तीन’च्या हद्दीत ८,७१७ आगीच्या घटना घडल्या असून त्यात ४९६ गगनचुंबी इमारती, १,३८२ रहिवासी इमारती, ९३९ व्यावसायिक इमारती आणि ४४३ झोपडय़ांचा समावेश आहे. तसेच ‘परिमंडळ-चार’च्या  हद्दीत एकूण ८,३२८, ‘परिमंडळ-पाच’च्या हद्दीत ५,६८३, तर ‘परिमंडळ-सहा’च्या हद्दीत एकूण ५,१०७ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. ‘परिमंडळ-तीन’मध्ये सर्वाधिक म्हणजे ४९६ गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली होती. तर ‘परिमंडळ-चार’च्या हद्दीतील १८३५ निवासी इमारतींना आगीची झळ बसली होती. ‘परिमंडळ-एक’मधील सर्वाधिक म्हणजे ९८७ व्यावसायिक इमारती, तर ‘परिमंडळ-पाच’मध्ये सर्वाधिक १२७३ झोपडय़ांना आग लागली होती.

दशकभरातील आगीच्या दुर्घटना (२००८-२०१८)

एकूण घटना            ४८,४३४

गगनचुंबी इमारती        १५६८

निवासी इमारती         ८७३७

व्यावसायिक इमारती     ३८३३

झोपडपट्टी              ३१५१

कारणे

शॉर्टसर्किट             ३२,५१६

गॅस सिलिंडरमधून गळती  १११६

अन्य कारणे            ११,८८९

६०९ मृत्यू

८९ कोटी चार लाख

८६ हजार १०२ रुपये मालमत्तेचे नुकसान

(माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जावर पालिकेकडून उपलब्ध झालेली माहिती.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1568 high rise building caught fire in last ten years zws