मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुम गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीत १६ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पात्र विजेत्यांनी न्यायालयात धाव घेतली असून घरांच्या किमतीत केलेली वाढ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आज, बुधवारी सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीकडे पात्र विजेत्यांचे लक्ष लागले आहे.

कोकण मंडळाने २०१८ च्या सोडतीतील बाळकुम प्रकल्पातील १२५ घरांसह २००० वर्षातील लाभार्थ्यांसाठीच्या ६९ घरांच्या किंमतींमध्ये १६ लाख रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे, या घरांची किंमत ४३ लाख रुपयांवरून ५९ लाखावर पोहोचली आहे. कोकण मंडळाने व्याज, पाणीपुरवठा सुविधा, वाहनतळ आणि मेट्रो उपकराचा भार टाकल्याने घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ रद्द करावी अशी मागणी या विजेत्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, कोकण मंडळाने ही मागणी फेटाळून लावून तात्पुरते देकार पत्र पाठवून चार टप्प्यात घराची रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. २५ टक्क्यांचा पहिला हप्ता जवळपास सर्व विजेत्यांनी भरला आहे. तर आता ३१ जानेवारीपर्यंत ५० टक्के रक्कम भरायची आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम घरांना निवासी दाखला मिळाल्यानंतर भरायची आहे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

हेही वाचा – राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली, पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना

हेही वाचा – “केस कापून येतो, माझ्यासाठी…” आईला सांगितलेले शब्द ठरले शेवटचे! मुंबईत भरधाव बाईकवरचा ताबा सुटल्याने दोन तरूणांचा मृत्यू

कोकण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घरांचा ताबा देऊ असे सांगत रक्कम भरून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रकल्पातील वाहनतळाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवासी दाखला मिळाल्यानंतरच उर्वरित तीन टप्प्यांतील रक्कम घ्यावी, अशी मागणी विजेत्यांनी कोकण मंडळाकडे केली आहे. मात्र, ही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे, काही विजेत्यांनी एकत्र येऊन आता न्यायालयात धाव घेतल्याची माहिती एका विजेत्याने दिली. १६ लाख रुपयांची वाढ मागे घ्यावी आणि निवासी दाखला मिळाल्यानंतरच घराची रक्कम भरून घ्यावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी एक सुनावणी झाली असून आज बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.