मुंबईः मुलुंड पश्चिम येथे दोन अल्पवयीन मुलांनी चाकूने भोसकून मित्राची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. दोन्ही मुलांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हत्येनंतर दोन चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा >>> महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

मुलुंड पश्चिम येथील बालाजी मंदिराशेजारी सोमवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मुलगा १६ वर्षांचा असून तो त्याच परिसरात पदपथावर राहात होता. दोन्ही आरोपी १६ वर्षांचे आहेत. मृत मुलगा व आरोपी मित्र असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातून दोन्ही आरोपींनी या मुलाची हत्या करण्याचे ठरवले.  दोन आरोपी व मृत मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यातून एकमेकांना शिवीगाळ व मारहाणही करण्यात आली होती. अखेर दोन्ही आरोपींनी चाकूने मित्राच्या पोटावर व पाठीवर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दोन आरोपींपैकी एकाविरोधात यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू पोलिसांनी हस्तगत केले आहेत. दोन्ही मुलांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मृत मुलगा त्याच्या आईसोबत पदपथावर राहात होता. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.