चोरी वाढल्याने ‘बेस्ट’कडून धडक कारवाई

मुंबई : मुंबईकरांचे घर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आदी प्रकाशमान करणाऱ्या बेस्ट उपक्रमाचा विद्युतपुरवठा विभागाला वीजचोरीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी बनू लागला आहे. ‘वीज चोरून वापरू नका, कायदेशीर मीटर बसवूनच वीज वापरा’ असा वारंवार संदेश देऊनही वीजचोरी रोखण्याचा प्रयत्न बेस्टकडून करण्यात येत आहे. मात्र चोरीचे प्रमाण वाढत असल्याने अखेर बेस्टच्या विद्युत विभागाच्या दक्षता पथकाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांत या पथकाने केलेल्या कारवाईत १७ हजार वीज चोरांवर दंडाचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापोटीची तडजोड रक्कमही वसूल करण्यात आली आहे.

बेस्टचा विद्युतपुरवठा विभाग परिवहन विभागाच्या तुलनेत नेहमीच फायद्यात होता. परंतु विविध कारणांमुळे या विभागाला तोटा होऊ लागला आहे. विद्युत विभागाला वीजचोरीचा मोठा फटका बसू लागला आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांपासून घरगुती वीज वापरकर्त्यांकडून मीटरमध्ये फेरफार केलेले आढळले आहे. तर अनधिकृत झोपडपट्टय़ांमध्येही अवैध जोडणीद्वारे वीज वापरली जाते. पदपथावरील फेरीवालेही अनधिकृतपणे विजेचा वापर करीत आहेत. मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावरच पथाऱ्या पसरल्या आहेत. या फेरीवाल्यांचे ठेले संध्याकाळनंतर विजेच्या दिव्याने उजळून निघतात. मोहम्मद अली रोड, सारंग स्ट्रीट, कोळसा स्ट्रीट, सरदार वल्लभभाई रोड, नौरोजी हिल रोड यासह मुंबईतील अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावरच बस्तान मांडले आहे. वीज मापकाचा वेग कमी करणे, वीज मापकाशिवाय थेट विद्युतपुरवठा घेणे इत्यादी प्रकारे वीजचोरी केली जाते. या वीज चोरांवर बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील दक्षता पथकाकडून कारवाई केली जाते.

२०११-१२ मध्ये दोन हजार १८६ वीज चोरांवर बेस्ट उपक्रमाने कारवाई केली होती. २०१२-१३ मध्ये हीच संख्या १,९२४ होती. २०१८-१९ मध्ये १,७१९ आणि २०१९-२० मध्ये कमी होऊन १,३५५ झाली. करोनाकाळात २०२०-२१ मध्ये तर ही कारवाई आणखी थंडावली आणि ८२० वीज चोर पकडल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. गेल्या दहा वर्षांत दक्षता पथकाने १७ हजारांहून अधिक वीज चोर पकडले. वीज चोरांवर कठोर दंडात्मक कारवाईबरोबर वीजचोरी होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाकडून जनजागृती मोहीमही राबविण्यात येते. शिवाय व्यापारी आणि घरगुती वीज ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची माहितीही देण्यात येते. त्यामुळे यापैकी काही जण अधिकृतरीत्याही वीज घेऊ लागले आहेत. परिणामी वीजचोरीचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

८१ कोटींची वसुली

वीजचोरीमुळे बेस्ट उपक्र माचा महसूलही बुडतो. बुडालेला महसूल वीज चोरांकडून दंडाच्या स्वरूपात वसूल केला जातो. १७ हजार वीज चोरांकडून १०४ कोटी रुपये २३ लाख ३९ हजार रुपये येणे बाकी होते. यापैकी फक्त ८१ कोटी १४ लाख ९९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

महिलांना मुद्रांक शुल्क दरात एक टक्क्य़ांची सवलत लागू केली गेली आहे. पण ही सवलत देताना काही अटीही घालण्यात आल्या आहेत. पण आता याच अटी जाचक ठरत आहेत. १५ वर्षे घर विकता येत नाही आणि त्याआधी विकले तर सवलत काढून घेतली जाते. यामुळे महिला ग्राहक पुढे येत नाहीत किं वा कु टुंबाकडून घर त्यांच्या नावावर केले जात नाही. तेव्हा या अशा अटी दूर केल्या तर नक्कीच ही टक्केवारी वाढण्यास मदत होईल.

– यशिका रोहिरा, कर्मा रियल्टर्स