उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : प्राचार्य पद रिक्त ठेवून प्रभारी पदावर महाविद्यालयांचा कारभार सुरू असल्याच्या तक्रारी मागील काही महिन्यांपासून येत होत्या. परंतु या संदर्भातील ठोस आकडेवारी शनिवारी माहितीच्या अधिकारीतून उघड झाली. त्यानुसार मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या १७८ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पद रिक्त असल्याचे समोर आले आहे.

अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती मागवली होती. त्यानुसार, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ८०८ महाविद्यालयाची नोंद असून ८१ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे. तर १७८ महाविद्यालये प्राचार्यांविना असून त्यापैकी काही  ठिकाणी प्रभारी पद नेमण्यात आले आहे.  विशेष म्हणजे २३ महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे तपशील विद्यापीठाच्या अभिलेखावर उपलब्धही नाहीत.

प्राचार्यपद रिक्त असतानाही अनेक महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमास मंजुरी देण्यात आली. ‘नवीन अभ्यासक्रमास मंजुरी देताना महाविद्यालयांमध्ये प्राचार्य असणे अनिवार्य आहे. असे असतानाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कुलगुरु यांनी कोणत्या आधारावर प्रस्ताव मंजूर केला,’ असा प्रश्न गलगली यांनी उपस्थित केला आहे.

या संस्थांमध्ये रिक्त पदे…

केजे सोमय्या, ठाकूर एज्युकेशनल ट्रस्ट, शहीद कलानी मेमोरियल ट्रस्ट, तलरेजा महाविद्यालय, वर्तक महाविद्यालय, बॉम्बे फ्लॅइंग क्लब महाविद्यालय, रामजी असार महाविद्यालय, गुरुनानक विद्यक भांडुप, शेठ एनकेटीटी महाविद्यालय, जितेंद्र चौहान महाविद्यालय, मंजरा महाविद्यालय, रिझवी महाविद्यालय, अकबर पिरभोय महाविद्यालय, संघवी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, विलेपार्ले केलवानी महाविद्यालय, बॉम्बे बंट्स महाविद्यालय, आरआर एज्युकेशन महाविद्यालय, एचआर महाविद्यालय, अंजुमन इस्लाम महाविद्यालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 178 colleges affiliated to mumbai university without principals akp
First published on: 16-01-2022 at 01:11 IST