मुंबईः मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात १८ वर्षीय तरूणीचा मृतदेह मंगळवारी सापडला. तरूणीवर अतिप्रसंग करून गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वीपासूनच वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक बेपत्ता झाला होता. त्याचा हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे.

हेही वाचा >>> आईवरून चिडवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने ४३ वर्षीय व्यक्तीचा…; कांदिवली पश्चिममधील धक्कादायक घटना

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद असून तेथे राहणारी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी खोलीत प्रवेश केला असता तरुणीचा मृतदेह सापडला, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) अभिनव देशमुख यांनी दिली.

खोलीत मृतदेह जमिनीवर पडलेला होता. तसेच मृतदेह विवस्त्र असून गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती. मृतदेह सापडला त्या खोलीचे दार  बाहेरून बंद होते. त्यामुळे अतिप्रसंग करून विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे. तेथे शवविच्छेदनानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता का, ते स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> मुंबईत १८ वर्षांच्या तरुणाची चार मित्रांनी चाकूचे वार करत केली हत्या, वाढदिवसाच्या पार्टीवरुन वाद झाल्याने घडली घटना

मुलीचे वडील हे अकोल्याचे राहणारे असून ते पत्रकार आहेत. त्यांना घटनेबाबत कळवण्यात आले असून अकोल्याहून मुंबईला यायला निघाले आहेत. मृत तरूणी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. गेल्या एका वर्षापासून ती या वसतिगृहात राहत होती. दोन-तीन दिवसांनी ती गावी जाणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीटही काढले होते. दरम्यान, वसतिगृहात काम करणारा सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया बेपत्ता आहे. तो गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ वसतिगृहात काम करत होता. तो मोबाईल वसतिगृहाच्या इमारतीमध्येच सोडून गेला आहे. त्याचा हत्येत सहभाग असल्याचा संशय असून त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक पाठवण्यात आले आहे. दरम्यान चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळ एक बेवारस मृतदेह सापडला असून तो सुरक्षा रक्षकाचा असल्याचा दाट संशय आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.