…तर पाच वर्षात झोपा काढल्या का, जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून घाईगडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार सुरु आहे.

जयंत पाटील

गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भाजपा सरकावर टीका केली आहे. ट्विट करुन पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.


जयंत पाटील म्हणतात, निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून घाईगडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार सुरु आहे. सरकारने आता आपला हा उद्योग थांबवावा. त्यांच्या सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णयही त्यांनी लक्षात ठेवावा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याचा राजकारणासाठी वापर करुन मतं मागणारे दोषीच आहेत, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन शिवसेनेकडून भाजपावर अद्यापही टीका सुरु असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली तरी त्यांच्यात अद्याप अनबन सुरुच असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 180 gr notifications in a week this means sleeping in five years says ncp