scorecardresearch

Premium

मुंबई : व्यवसायात गुंतवणूकीच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक

व्यवसायात गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ जणांची दोन कोटींना फसवणूक करण्यात आल्यायाचा प्रकार उघड झाला आहे.

2 crore fraud in name of investment in business
२८ जणांची फसवणूक झाल्याचा आरोप (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : खोटे दागिने विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ जणांची दोन कोटींना फसवणूक करण्यात आल्यायाचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
fake crime, Police, extortion, 5 lakh, student, Pimpri, threatening, implicate,
धक्कादायक : पिंपरीत विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली पाच लाखांची खंडणी
15 crores fraud
मुंबई : पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू

आणखी वाचा-रुग्णालयातील शौचालयात मृत नवजात बालिका, शीव रुग्णालयातील प्रकार

जोगेश्वरीतील व्यापारी निपुल खिमजी भाई संघवी (४४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, ७ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. यादरम्यान आरोपी हसमुख भाटी याने तक्रारदार यांच्यासह २८ जणांना खोटे दागिने विक्रीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास १० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, नागरिकांनी एकूण पाच कोटींची गुंतवणूक केली. अखेर, तक्रारदार यांनी गुंतवणुकीची रक्कम परत करण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तीन कोटी परत केले. पण उर्वरित दोन कोटी देण्यास टाळाटाळ सुरु झाल्याने अखेर तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हसमुख भाटी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 crore fraud in name of investment in business mumbai print news mrj

First published on: 08-12-2023 at 21:54 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×