अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष प्रवेश फेरीनंतरही जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही. अकरावीच्या विशेष फेरीत ७९ हजार ५१३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले असून त्यातील ४९ हजार ८०० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : बालसुधारगृहातून पळालेल्या मुलाला पोलिसांनी तीन तासांत पकडले

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

अकरावीच्या तीन नियमित केंद्रीय प्रवेश फेऱ्यांनंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित न केलेले हजारो विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेले. अनेक विद्यार्थी अपात्र ठरले, अनेकांनी प्रवेश रद्द केले. या सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन विशेष प्रवेश फेरी घेण्यात आली. या फेरीसाठी १ लाख ६४ हजार १९१ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी १ लाख १३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र, त्यातील ७९ हजार ५१३ विद्यार्थ्यांनाच या फेरीत महाविद्यालय मिळू शकले आहे. या फेरीतही २० हजार ६२१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही. यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला होता. विशेष प्रवेश फेरीत ४९ हजार ८०० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. मात्र, हे सर्व विद्यार्थी प्रवेश निश्चित करणार का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रवेशाची स्थिती
एकूण प्रवेश क्षमता – ३ लाख ७१ हजार ४७५
निश्चित झालेले एकूण प्रवेश – १ लाख ६२ हजार ८१७
कोट्यात निश्चत झालेले प्रवेश – ४८ हजार ८९