scorecardresearch

धक्कादायक! ऑटोरिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने दोन मजुरांचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

rape 22
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

ऑटोरिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने पनवेलमध्ये दोन मजुरांनी एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अविनाश चव्हाण (२२) आणि सूरज देवडे (२१) अशी या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू दोषी, न्यायालयाचा मोठा निर्णय

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणी खोपोली येथील एका लेडीज बारमध्ये वेट्रेस म्हणून कामाला आहे. शनिवारी रात्री ती कामावरून परतताना पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉलजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली होती. जेवण झाल्यानंतर घरी जाण्यासाठी ती हॉटेलसमोर ऑटोरिक्षाची वाट बघत होती. तेवढ्यात दोन्ही आरोपी तिथे आले. दोघांनी तरुणीजवळ जाऊन ‘एवढ्या रात्री रस्त्यावर एकटीने थांबणे योग्य नाही. आमची ऑटो हॉटेलच्या मागे आहे. आम्ही तुम्हाला घरी सोडतो’, असे सांगितले.

हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; महिलेसह चौघांचा मृत्यू

बराच वेळ ऑटो न मिळाल्याने तरुणीने त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने पडक्या इमारतीत नेले. तिथे त्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला मारहाण केली. त्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. दरम्यान, तरुणीने पोलीस ठाणे गाठून सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या मदतीने २४ तासांच्या आता पनवेलमधील एका चाळीतून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 09:12 IST