बलात्कार करून तरुणीची हत्या ; प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्याने कृत्य; दोघांना अटक

कुर्ला पश्चिमेतील एचडीआयएल कंपाउंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता.

मुंबई : कुर्ला येथील एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकराने मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुर्ला पश्चिमेतील एचडीआयएल कंपाउंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा संशय होता. 

घाटकोपर येथील तीन तरुण  गुरुवारी इमारतीच्या छतावर चित्रफीत तयार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे मृतदेह आढळला. त्यांनी  पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात सूचना दिली. 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे आणि त्याच्या डोक्यावर, पोटावर चाकूने भोसकल्याच्या गंभीर जखमा आढळल्या, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून घटनास्थळाचे न्यायवैद्यक परिक्षण केले. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी परिसरातील बेपत्ता महिलांची माहिती घेण्यास सुरूवात केली. या तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृत तरुणीचा प्रियकर रेहान शेख (२०) आणि त्याचा मित्र फैजल शेख (२०) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत तरूणीने लग्नासाठी आरोपीच्या मागे तगादा लावला होता, पण त्याला तिच्याशी लग्न करायचे नसल्यामुळे  त्याने मित्र फैजलच्या मदतीने तिची हत्या केली.

प्राथमिक चौकशीत आरोपीने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार केला नसल्याचे पोलिसांना सांगितले होते, पण पोलीस त्याबाबत अधिक चौकशी करत आहेत. परंतु पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 20 year old woman allegedly raped murdered in kurla zws

ताज्या बातम्या