scorecardresearch

Premium

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला :जखमींविषयीच्या प्रश्नांवर प्रज्ञासिंह ठाकूर भावूक

न्यायालयाच्या प्रत्येक प्रश्नाला मला माहीत नाही हे उत्तर देणाऱया साध्वी यांना बॉम्बस्फोटातील मृतांचे शवविच्छेदन करणाऱया आणि जखमींवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिलेल्या साक्षींशी संबंधित प्रश्न विचारण्यास न्यायालयाने सुरूवात केली.

pardya singh thakur
भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

मुंबई : मालेगाव येथे सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचे शवविच्छेदन करणाऱया आणि जखमींवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिलेल्या साक्षींशी संबंधित प्रश्न विशेष न्यायालयाकडून विचारले जात असताना याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भावूक झाल्या. परिणामी, काही कालावधीसाठी प्रश्नोत्तरे थांबविण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करणाऱया राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सरकारी पक्षाचे साक्षीपुरावे नोंदवण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, सरकारी पक्षाने नोंदवलेल्या साक्षीपुराव्यांशी संबंधित प्रश्न आरोपींना विचारले जातात आणि त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून व नोंदवून घेतले जाते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी ही प्रक्रिया मंगळवारी सुरू केली. त्यानुसार, सरकारी पक्षाने आतापर्यंत नोंदवलेल्या साक्षीपुराव्यांबाबत या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी यांचे म्हणणे न्यायालयाने नोंदवून घेतले.

Black Magic
मालमत्तेच्या वादातून जादुटोण्याचा प्रकार; मांत्रिकासह सहाजणांविरुद्ध गुन्हा 
divorced husband living another woman not cruelty judgement Delhi high court
विभक्त पतीनं दुसर्‍या स्त्रीबरोबर राहणं क्रूरता नाही!
children void, voidable marriages rights to claim parents properties
बेकायदेशीर लग्नांमधून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या मालमत्तेत हक्क!
22 year old youth released on bail in rape case
न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे न्यायदानावर परिणाम; ५० लाख ७३ हजार प्रकरणे प्रलंबित

हेही वाचा >>>अंधेरीमध्ये तिकीट तपासनीसांची फौज; एकाच दिवसात २,६९३ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून सात लाख रुपये दंड वसूल

न्यायालयाच्या प्रत्येक प्रश्नाला मला माहीत नाही हे उत्तर देणाऱया साध्वी यांना बॉम्बस्फोटातील मृतांचे शवविच्छेदन करणाऱया आणि जखमींवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिलेल्या साक्षींशी संबंधित प्रश्न विचारण्यास न्यायालयाने सुरूवात केली. त्याला उत्तर देताना एका क्षणाला साध्वी यांना भावना अनावर झाल्या. परिणामी, न्यायालयीन कामकाज १० मिनिटे थांबवावे लागले. याबाबतचे जवळपास ६५ ते ६० प्रश्न साध्वी यांना विचारण्यात आले. दरम्यान, साक्षीपुराव्यांशी संबंधित विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांना साध्वी यांनी मला माहीत नाही हे उत्तर दिले. मात्र, स्फोटातील जखमींशी संबिधत प्रश्न विचारण्यास सुरूवात झाल्यावर त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याचे न्यायालयाला सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2008 malegaon blast case pragya singh thakur emotional on questions about injuries mumbai print news amy

First published on: 04-10-2023 at 00:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×