बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली. ही कारवाई आणि कारवाई करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, शाहरुख खान आणि समीर वानखेडे या दोघांची आर्यन प्रकरणाच्या आधीही भेट झाली होती, २०११ साली. काय घडलं होतं त्यावेळी ? जाणून घ्या.

जुलै २०११ मध्ये, हॉलंड आणि लंडनच्या सहलीनंतर शाहरुख त्याच्या कुटुंबासह मुंबईत परत आला, तेव्हा वानखेडेंनी त्याला विमानतळावरच अडवलं होतं. कर न भरताच विदेशी वस्तू भारतात आणल्याचा आरोप शाहरुखवर करण्यात आला होता. वानखेडे त्यावेळी विमानतळावर कस्टमचे सहाय्यक आयुक्त होते. किमान २० बॅग सोबत असलेल्या शाहरुखची अनेक तास चौकशी करण्यात आली आणि कर चुकवल्याबद्दल वानखेडेंच्या टीमने त्याचे सामान तपासले.

हेही वाचा – “क्रूझ पार्टीत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाचे वानखेडेंशी संबंध”; नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप

ज्यावेळी शाहरुख खानने दीड लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर त्याला आणि त्याच्या परिवाराला सोडण्यात आलं. विमानतळावर आपलं कर्तव्य बजावत असताना वानखेडेंनी अनुष्का शर्मा, मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांच्यावरही कारवाई केली होती.

टोरंटोहून भारतात परतत असताना अनुष्काला जुलै २०११ मध्ये ४० लाख रुपयांचे हिऱ्याचे अघोषित दागिने घेऊन जाण्याच्या आरोपावरून रोखण्यात आले होते. २०१३ मध्ये वानखेडे यांनी मिकाला विमानतळावर विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यानुसार (फेमा) विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलन बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते.