मुंबई : मालवणी येथे एका महिलेने २२ वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन पतीसोबत तिचे अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चित्रीकरणाद्वारे धमकावून तरूणीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी बलात्कार, खंडणी मागितल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारीनुसार आरोपी महिलेने पीडित तरूणीला तिच्या घरी बोलावले होते. त्यावेळी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तरुणी बेशुद्ध होताच आरोपी महिलेच्या पतीने तरूणीवर बलात्कार केला व आरोपी महिलेने त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित चित्रीकरण समाज माध्यमावर वायरल करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीकडे १० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे घाबरलेल्या तरूणीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. त्यावेळी तिने तात्काळ पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा…“काँग्रेसचे हात मराठी माणसांच्या रक्ताने माखलेले, त्याच हाताशी उद्धव ठाकरेंनी…”; आशिष शेलार यांचे टीकास्र!

त्यानुसार तरूणीने मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, गुंगीचे औषध देणे, धमकावणे, खंडणीची मागणी करणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या पतीचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 year old woman drugged filmed obscene video in mumbai accused demanded extortion mumbai print news psg
First published on: 02-05-2024 at 11:56 IST