मुंबई : उपनगरीय रेल्वेबरोबरच आता बेस्ट बसमधूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. शिथिल झालेले निर्बंध, वाढलेली प्रवाशी संख्या आणि धावत असलेल्या विनावाहक बससेवांचा गैरफायदा फुकटे प्रवासी घेत आहेत. २०२१ मध्ये २३ हजार ९७२ विनातिकीट प्रवासी आढळले असून २०२०च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी अनेकदा सराईतपणे हात दाखवून ‘पास’ असे म्हणत निसटण्याचा प्रयत्न करतात. गर्दीच्या बसमध्ये चढलेले अनेक प्रवासी दरवाज्याजवळ उभे राहून तिकीट काढल्याशिवायच आपल्या थांब्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात. काही प्रवासी गर्दीच्या वेळी वाहकाकडून मुद्दाम तिकीट घेत नाहीत आणि आपल्या थांब्यावर उतरून जातात. या सर्वच प्रवाशांना पकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ करत असते. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 thousand 972 ticketless commuters caught in best buses zws
First published on: 20-01-2022 at 00:31 IST