मुंबई : कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात सातहून अधिक नागरिकांचा मृत्यू आणि ४२ जण जखमी झाले. या घटनेमुळे बेस्ट बसमधील सुरक्षित प्रवासाची हमी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘बेस्ट’च्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचे २४७ अपघात झाले. त्यात भाडेतत्त्वावरील बसचे सर्वाधिक अपघात असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड रोष आहे.

बेस्ट उपक्रमात २०१९ पासून भाडेतत्त्वावरील बसच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. चालक-वाहक यांना कामावरून काढण्याची धमकी दिल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी करणे बंद केले. काही दिवसांपासून बसमध्ये आगीच्या घटना, बस नादुरुस्त, विद्युत बॅटरी पेट घेणे अशा घटना घडल्या आहेत.

mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण

हेही वाचा >>> वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त

बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचे २०२२-२३ ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत २४७ अपघात झाले आहेत. यापैकी ६२ प्राणांतिक आहेत. यात भाडेतत्त्वारील बसच्या ४० आणि स्वमालकीच्या बसचे २२ प्राणांतिक अपघात झाले आहे. २०२४-२५ मध्ये भाडेतत्त्वारील बसचे २० आणि स्वमालकीच्या बसचे ४ प्राणांतिक अपघात झाले.

हेही वाचा >>> पोलीस निरीक्षक मुंबईत परतले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर झाली होती बदली

जबाबदारी कोणाची?

बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी बेस्ट उपक्रमाची असते. तर, कंत्राटदाराच्या बस चालकाकडून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते.

चालकाचा अनुभव अपुरा

बस चालक संजय मोरे यांना वाहनावरील ताबा सुटल्याने अचानक ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यासह मोरे यांना विद्याुत वाहन चालवण्याचा पुरेसा अनुभव नव्हता. त्यांनी विद्याुत वाहन चालवण्याचे काही दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते. चार वर्षांपासून त्यांनी विविध भाडेतत्त्वावरील कंत्राटदाराकडे काम केले होते. ते बेस्टची मिडी बस चालवत होते. तर, नोव्हेंबर २०२४ रोजी ते ईव्ही ट्रान्समध्ये सामील होऊन, विद्याुत बस चालवू लागले होते.

अहवालाची प्रतीक्षा

हैदराबादस्थित ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने उत्पादित केलेल्या व एव्ही ट्रान्स कंपनीने भाडेतत्त्वावर पुरवलेल्या १२ मीटर लांबीच्या अपघातग्रस्त बसमध्ये तांत्रिक बिघाड आहे का, हे तपासण्यासाठी न्यायवैद्याक विश्लेषक व प्रादेशिक परिवहन अधिकारी घटनास्थळी गेले होते. प्राथमिक अहवालानुसार, ब्रेक सुसस्थितीत होते. इतर तांत्रिक बाबी योग्य प्रकारे कार्यरत होत्या. अहवाल परिवहन विभागाला प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण कळेल.

बेस्ट’नामा

● बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचे २०२२-२३ ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत १४३ गंभीर अपघात झाले आहेत. तर, ४२ किरकोळ अपघात झाले आहेत. तर, २०२४-२५ या कालावधीत भाडेतत्त्वारील बसचे ४८ गंभीर आणि ११ किरकोळ अपघात झाले. तर, स्वमालकीच्या बसचे २१ गंभीर आणि २ किरकोळ अपघात झाले.

● बेस्ट उपक्रमाचे स्वत:चे एकूण ७,२१२ बस चालक आणि ७,४२३ बस वाहक कार्यरत आहेत. तर, ६,५६३ कंत्राटी बसचालक आणि २,३४० कंत्राटी बसवाहक आहेत.

● विद्युत बसचे २०२४-२५ या वर्षात १२ प्राणांतक अपघात झाले आहेत. यामध्ये ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या बसच्या दोन, ईव्ही-ट्रान्सच्या आठ आणि टाटा मोटर्सच्या दोन अपघातांचा समावेश आहे.

बस कंत्राटदारांमार्फत चालवण्यात येत आहेत. बेस्ट उपक्रमात बसगाड्या चालवण्यासाठी सहा कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

४० बस ओलेक्ट्रा ग्रीनटेक

२७५ बस – ईव्ही-ट्रान्स

६२५ बस – श्री मारूती ट्रॅव्हल्स

३४० बस – टाटा मोटर्स

५७० बस – मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट ५० बस – स्वीच मोबिलिटी

Story img Loader