scorecardresearch

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी यंदा एसटीच्या २ हजार ५०० जादा गाड्या

उद्यापासून १ हजार ३०० गाड्यांचे आरक्षण सुरू

st bus
(संग्रहीत छायाचित्र)

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आरक्षित झालेल्या असतानाच एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. यंदा गणेशोत्सवनिमित्त कोकणासाठी एसटी महामंडळाने अडीच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०० जादा गाड्यांचे आरक्षण शनिवार, २५ जूनपासून सुरू होणार आहे. जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघर मधून उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण तिकीट खिडक्या, ऑनलाईन आणि एसटी महामंडळाकडून नियुक्त एजन्टकडूनही मिळणार आहे. या जादा गाड्यांव्यतिरिक्त ग्रुप आरक्षणासाठीही लवकरच एसटी उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्यास अधिक गाड्या सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने ठेवली आहे.

यंदा गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. अनेक जण साधारण चार ते पाच दिवस आधीच गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदा रेल्वेगाड्यातील आरक्षण संपल्याने एसटी महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा करून दिलासा दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2500 extra st bus for ganeshotsav this year mumbai print news msr

ताज्या बातम्या