मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्लाप्रकरणी संशयित आरोपी तहव्वूर हुसैन राणाविरोधात गुन्हे शाखेने ४०५ पानांचे आरोपपत्र सोमवारी विशेष न्यायालयात दाखल केले. हल्ल्याच्या पंधरा दिवसांपूर्वी तहव्वूर राणा स्वत: मुंबईत आला होता. याशिवाय हेडलीने पाठवलेले ईमेल व हेडलीसोबत राणाने केलेला प्रवास याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेला राणा हा पाचवा आरोपी आहे. यापूर्वी चार आरोपींविरोधात गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल असून गुन्हे शाखेने सोमवारी विशेष यूएपीए न्यायालयात राणाविरोधात आरोपपत्र दाखल केले. मुंबई
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 11 terror attack case chargesheet filed against tahavur rana mumbai print news ysh