scorecardresearch

Premium

मुंबईः दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला १२ तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका

गुन्ह्याच्या तपासात कोणतीही ठोस माहिती नसताना तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी महिला सोनम मंतोश साहू हिला १२ तासांत ताब्यात घेतले.

28 year old woman who kidnapped 18 month child arrested within 12 hours
मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक प्रातिनिधिक फोटो

मालाड परिसरातून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या २८ वर्षीय महिलेला १२ तासांत अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून आरोपी महिलेने मुलाचे अपहरण का केले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून एकाची हत्या

reservoir at Malabar Hill
हँगिंग गार्डनमध्ये आरेची पुनरावृत्ती नको, मलबार हिलच्या नागरिकांनी व्यक्त केली भीती
unique celebration of birth of girl child in the thergaon hospital
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत; बालिकेच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यात डॉक्टरांकडून बचत
morbe dam pooja
मोरबेच्या जलपूजनाची घाई; नाईकपुत्र अडचणीत, पालिकेच्या परवानगीविना पूजाविधी; घुसखोरीबद्दल प्रशासनाची तक्रार
police conducted raid on edible oil factory
नागपूर: खाद्य तेलाच्या कारखान्यावर पोलिसांचा ‘नाट्यपूर्ण’ छापा, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

मालवणी परिसरात राहणाऱ्या कविता वडार यांची नऊ वर्षांची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा गावदेवी मंदिर परिसरात खेळत होते. त्यावेळी २५ वर्षीय आरोपी महिला तेथे आली व तिने मुलीला २०० रुपये देऊन दुकानातून बिस्किट आमण्यासाठी पाठवले. ती गेल्यानंतर आरोपी महिलेने दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> व्हेल माशाच्या उलटीप्रकरणी उच्चशिक्षीत तरूणासह दोघांना अटक

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ११) अजयकुमार बंसल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना तात्काळ तपास करण्याबाबत सूचना केल्या. परिमंडळातील विविध पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात कोणतीही ठोस माहिती नसताना तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी महिला सोनम मंतोश साहू हिला १२ तासांत ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातील दीड वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली असून  महिला आरोपी अद्याप उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 28 year old woman who kidnapped 18 month child arrested within 12 hours mumbai print news zws

First published on: 29-09-2023 at 16:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×