मुंबई : प्रजासत्ताकदिनी मुंबई पोलीस दलातील २९०० पोलिसांना बढतीची भेट मिळणार आहे. गेल्या काही काळापासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बढत्या प्रलंबित होत्या. त्यात पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदासाठी कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येणार आहे.

चित्ररथाचे सारथ्य..

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश

मुंबई पोलीस दलात दर महिन्याला १२० ते १५० पोलीस निवृत्त होतात. त्यामुळे दरवर्षी १५०० ते १८०० पोलिसांना बढती मिळते. पण करोनानंतर मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदासाठी मोठय़ा प्रमाणात बढत्या प्रलंबित होत्या. २६ जानेवारीला मुंबई पोलीस दलातील २९०० पोलिसांना पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा विविध पदावर बढती देण्यात येणार आहे. याबाबत उपायुक्त (मुख्यालय २) तेजस्वी सातपुते यांना विचारले असता त्यांनी प्रजासत्ताकदिनी २९००हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Republic Day 2023 Parade BSF च्या महिला कॅमल राईडर्स ‘कर्तव्य पथा’वर करणार संचलन

मुंबई पोलीस दलात सध्या ३७ हजार पोलीस कर्मचारी आहेत. मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेने हे संख्याबळ कमी आहे. दोन वर्षे भरती प्रक्रिया रखडल्यामुळे मुंबई पोलीस दलात या वर्षी प्रथमच सात हजार पदांसाठी भरती होत आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून त्यापूर्वी पोलीस दलातील प्रलंबित बढल्या करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यात ३००हून अधिक पोलीस हवालदारपदाच्या बढत्या आहेत. उर्वरित पदांसाठी २५००हून अधिक कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.