मुंबई: पोषण आहाराच्या अभावामुळे एकीकडे महिलांमधील रक्तक्षयाचे(अ‍ॅनिमिया) प्रमाण वाढत असून दुसरीकडे त्यांच्यात स्थूलतेचे प्रमाणही गेल्या पाच वर्षांत वाढल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण पाचच्या ( एनएफएचएस ५) २०१९-२१ या दुसऱ्या टप्प्यातील अहवालातून निदर्शनास आले आहे. हा अहवाल नुकताच केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांच्या आरोग्याकडे मागील पाच वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे या अहवालातून अधोरेखित केले आहे. १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ५३ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांवर गेले आहे. यातही ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक ५८ टक्के तर शहरी भागात  ५३ टक्के आहे. गर्भवती महिलांमधीलही रक्तक्षयाचे प्रमाण वाढले असून ५२ टक्के झाले आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या एनएफएचएस-४ मध्ये हे प्रमाण ५० टक्के होते. ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे प्रमाण रक्तक्षयाचे प्रमाण सर्वाधिक ५४ टक्के तर शहरी भागात ४५ टक्के आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2nd phase of nfhs 5 survey report on women health zws
First published on: 28-11-2021 at 02:28 IST