मुंबई पोलिसांना बुधवारी एका व्यक्तीने फोनवरून धमकी दिली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. हा फोन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर करण्यात आला होता. फोनवरील व्यक्तीने सांगितलं की, मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार आहे. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून फोनवरील व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे.

मुंबईच्या अंधेरी येथील इन्फिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा फोनवरील व्यक्तीने केला आहे. या प्रकारानंतर सहार विमानतळ, आंबोली आणि बांगूर नगर पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आलं आहे. यासोबतच सीआयएसएफ आणि बीडीडीएस पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Mobile thieves arrested 30 mobiles seized in kandivali
मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
Panvel, Violent Clash, Erupts, between two groups, Police Attacked, near karanjade colony, fir register, against 18, crime news,
पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा- मोठी बातमी! उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

‘टाइम्स नाऊ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. मुंबई पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवत आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.