लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : काही दिवसांपूर्वी भिवंडीतील पडघा येथे मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ३० पोपट (रोझ-रिंग केलेले पॅराकीट्स) आणि तीन कापशी घारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे वनविभागाने पकडली. बसमधील पोपट आणि कापशी घारी जप्त केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये एक चालक आणि एक सहाय्यकाचा समावेश आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए), पडघा रेंज वन अधिकाऱ्यांना पक्ष्यांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भिवंडीतील पडघे येथे एक बस अडवून पोपट आणि घारींची सुटका केली. अटक आरोपींची चौकशी केली असता मालेगाव येथून पोपट व घारींची तस्करी झाल्याचे निष्पन्न झाले. प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-जर्मन बेकरी प्रकरण : आरोपी हिमायत बेगला पॅरोल नाकारल्यावरून न्यायालयाने कारागृह प्रशासनाला फटकारले

दरम्यान, पडघा टोल नाक्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने बस थांबविण्यात आली आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच डब्ल्यूडब्ल्यूएच्या सदस्यांना ठाणे शहरात सोडण्याची विनंती करण्यात आली. बस मुंब्रा टोल नाक्यावर येताच बसची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बसचालकाच्या केबिनमध्ये ३० पोपट आणि तीन कापशी घारी आढळल्या. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील मदनपुरा येथे पक्ष्यांना सोडण्यात येणार असल्याचे बसचालकाने चौकशीत सांगितले. यानंतर तीन हात नाक्याजवळील ठाणे वनविभाग कार्यालयात बस नेण्यात आली. बसमधील अन्य प्रवाशांना सोडण्यात आले आणि बस ताब्यात घेण्यात आली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चालक व सहाय्यकास अटक करून वन कार्यालयात नेले. याप्रकरणी पडघा परिक्षेत्र वन कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पोपटांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले. सुटका करण्यात आलेले पक्षी सध्या वनविभागाच्या ताब्यात आहेत. ‘वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन’ त्यांच्यावर वैद्याकीय उपचार करीत असून काही दिवसांत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

आणखी वाचा-Mumbai Road Accident : मुंबईत पुन्हा रॅश ड्रायव्हिंगचा बळी, भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मालेगावमधून तस्करी

यापूर्वीही मालेगावमधून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची तस्करी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ४८ करण पोपट (अलेक्झांड्रिन पॅराकीट्स) आणि सात कासवांची तस्करी करणारे दोन ट्रक पकडले होते. याप्रकरणी वनविभाग अधिकारी अधिक तपास करीत आहे.