मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येने बुधवारी तीनशेचा टप्पा पार केला. बुधवारी राज्यभरात ३०७ रुग्ण नव्याने आढळले, तर २५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येच्या आलेखातील वाढ कायम राहिली आहे. बुधवारी नव्याने आढळलेल्या ३०७ रुग्णांपैकी १९४ रुग्ण मुंबईत आढळले. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून बाधितांचे प्रमाण आता जवळपास तीन टक्क्यांपर्यंत गेले आहे. बुधवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. बुधवारी राज्यभरात एका मृत्यूची नोंद झाली आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड हजारावर

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णाच्या संख्येतही भर पडत आहे. मंगळवारी उपचाराधीन रुग्णसंख्या दीड हजारांच्या घरात गेली. बुधवारी तर ही संख्या १६०५ पर्यंत पोहोचली आहे.