लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभाग कार्यालयाने बोरिवली जवळील गोराई परिसरातील ग्लोबल पॅगोडा, तसेच गोराई समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ३२६ झोपड्या शुक्रवारी जमीनदोस्त केल्या. या ३२६ झोपड्यांपैकी १३३ झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे मल्हारराव कुलकर्णी रस्त्यावरील प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या झोपड्या निष्कासित केल्यानंतर जवळपास ६०० मीटरचा रस्ता रहदारीसाठी खुला झाला आहे.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

पर्यटकांना पॅगोडा, तसेच गोराई समुद्रकिनाऱ्याकडे जाण्यासाठी गोराई रोडवरूनच ये-जा करावी लागते. बहुसंख्य पर्यटक गोराई गावातील विविध ठिकाणी भेट देतात. परंतु, या रस्त्यावर १९९५ पासून उभ्या राहिलेल्या महात्मा फुले नगर झोपडपट्टीमुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.

व्हिडिओ सौजन्य- लोकसत्ता टीम

हेही वाचा… मुंबईत केवळ २५ ते ३० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण – आशिष शेलार; पश्चिम उपनगरातील नालेसफाईची भाजपकडून पाहणी

पर्यटकांची संख्या वाढावी आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी या हेतूने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी ही कारवाई केली. महानगरपालिकेचे २०० कर्मचारी, ३० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी बंदोबस्तासाठी ७० पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात होते.

हेही वाचा… मुंबई: प्रवाशाचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

दरम्यान, महानगरपालिकेने महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील पात्र ठरलेल्या ३२६ पैकी १३३ झोपडपट्टीधारकांचे मल्हारराव कुलकर्णी रस्त्याजवळ प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन केले. तर ४० झोपडीधारक सशुल्क पुर्नवसनांसाठी पात्र ठरतील, असे संध्या नांदेडकर यांनी सांगितले.