मुंबई : पावसाला अद्याप पुरेशी सुरुवातही झालेली नसताना मुंबईत इमारत पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कुर्ला येथे इमारतीची एक पूर्ण विंग कोसळल्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत ३३७ इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहेत. यामध्ये सर्वाधिक १६३ इमारती पश्चिम उपनगरात आहेत. तर शहर भागातील ७० आणि पूर्व उपनगरातील १०४ इमारतींचा या यादीत समावेश आहे. मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुर्ला परिसरात केवळ १२ इमारती अतिधोकादायक आहेत.

मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. तसेच इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. आजघडीला मुंबईत एकूण ३३७ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. यामध्ये सर्वाधिक १६३ इमारती पश्चिम उपनगरात, तर ७० शहर भागात आणि १०४ पूर्व उपनगरात आहेत.

Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

मुंबईतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या अशा सी-१ श्रेणीतील ३३७ इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली असून ती मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

कुठे किती इमारती

सर्वाधिक धोकादायक इमारती मुलुंड, अंधेरी, वांद्रे पश्चिम परिसरात आहेत. तर सर्वात कमी इमारती गिरगाव, चर्चगेट परिसरात आहेत.
मुलुंड (टी विभाग) – ४९
अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम (के – पश्चिम) – ४०
वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम – (एच – पश्चिम) – ३०
अंधेरी, जोगेश्वरी पूर्व – (के – पूर्व) – २८
वडाळा, नायगाव (एफ – उत्तर) – २६,
बोरिवली – (आर – मध्य) – २२

इमारत धोकादायक झाल्याची लक्षणे

आर.सी.सी. कॉलम, स्लॅबच्या रचनेत बदल, बीम आणि स्लॅब झुकणे, तळमजल्याचा भाग खचणे, कॉलममधील भेगा वाढणे, कॉलममधील काँक्रिट पडणे, कॉलमचा भाग फुगणे, कॉलम, बीम व विटांची भिंत यातभेगा पडणे, स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे काँक्रिट पडणे, इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

नागरिकांना आवाहन
अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी १९१६ / २२६९४७२५ / २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.